Ad will apear here
Next
(कै.) मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १६ ऑगस्टला
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी (कै.) मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. कै. मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दर वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्याहतून विद्यार्थी सहभागी होतात. ३५ वर्षांहून अधिक काळ ही स्पर्धा सुरू आहे.

ही स्पर्धा तीन गटांत होणार असून तालुकास्तरीय माध्यमिक गटासाठी अंतराळ संशोधक डॉ. विक्रम साराभाई, अंधश्रद्धा - एक सामाजिक कीड, आदर्श शिक्षणाची माझी संकल्पना, सोशल मीडिया आणि तरुणाई असे विषय आहेत. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ७५० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

आरक्षण आणि वास्तव, महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव चव्हाण, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, नवे शैक्षणिक धोरण, महासत्तेच्या दिशेने असे विषय जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी आहेत. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

वारीची प्रबोधन चळवळ, आर्थिक कोंडी आणि जागतिक महायुद्ध, गांधी समजून घेताना..., गदिमा - एक साहित्यरत्न असे विषय राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी आहेत. प्रथम क्रमांकाला ५०००, द्वितीय क्रमांकाला ३००० आणि तृतीय क्रमांकाला २००० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVCCD
Similar Posts
‘वक्तृत्वामुळे करिअरलाही नवा आयाम’ रत्नागिरी : ‘विद्यार्थ्यांनी फक्त बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेऊ नये. वक्तृत्वामुळे तुमच्या करिअरलाही नवा आयाम प्राप्त होतो. तसेच तुम्ही तुमच्या संस्थेचा चेहरा होता,’ असे प्रतिपादन रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी अमेय पोतदार यांनी केले. भारतीय जनता पक्ष आणि ‘जय हो प्रतिष्ठान’तर्फे रत्नागिरीत
कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पटवर्धन संगीत अकादमीतर्फे गेली चार वर्षे पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील नृत्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. यात कथ्थक नृत्य प्रकारात पूर्वा जोगळेकर हिने प्रथम, तर भरतनाट्यम प्रकारात मीरा खालगावकरने द्वितीय क्रमांक पटकावला.
आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी प्राणायाम व विविध आसने केली. या वेळी नगरसेविका मानसी करमरकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘भाजपचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी काम करू’; रत्नागिरीचे पक्षाध्यक्ष अॅड. पटवर्धनांचा सत्कार रत्नागिरी : ‘स्नेहभावनेतून करण्यात आलेला माझा सत्कार मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो. पुढील कार्यकाळासाठी हा प्रेरणास्रोत ठरेल. नागरी सत्कार हे मी माझे भाग्य समजतो. भाजपचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांसह काम करीन,’ असे प्रतिपादन भाजपचे रत्नागिरीचे नूतन जिल्हाध्यक्ष अॅड

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language